English Amti in English
इंग्लिश आमटी म्हणजेच थोडक्यात सांगायचे झाले तर डाळींचे सूप !! हि जरी आमटी असली तरी ती भाताबरोबर न खाता पावाबरोबर खातात. आणि आजारपणात किंवा तुम्ही आजारी नसलात तरीही हि आमटी नुसती प्यायलाही छान लागते.
साहित्य:
१ चमचा चणाडाळ
१ चमचा उडीदडाळ
१ चमचा तूरडाळ
१ चमचा मूगडाळ
२ मिरच्या
२-३ लसणीच्या पाकळ्या
१ लहान गाजर
१ टोमॅटो
३-४ आमसुल
तूप, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता
मीठ
कृती:
१) गाजर, टोमॅटो मध्यम आकारात चिरून घ्यावे, मिरच्या उभ्या कापून दोन तुकडे करावेत. लसणीच्या पाकळ्या ठेचून घ्याव्यात.
२) सर्व डाळी एकत्र करून धुवून घ्याव्यात. एका पातेल्यात ६-७ वाट्या पाणी घ्यावे त्यात या सर्व डाळी, गाजर, टोमॅटो, मिरच्या, लसणीच्या पाकळ्या, आमसुल घालून मंद आचेवर वरून झाकण ठेवावे.
३) मध्यम आचेवर सर्व डाळी शिजू द्याव्यात. हि आमटी पातळ असते त्यामुळे जर गॅसची आच जास्त होवून पाणी कमी झाले तर थोडे पाणी आवश्यकतेनुसार वाढवावे.
४) सर्व डाळी शिजल्या कि दुसर्या गॅसवर छोट्या कढल्यात तूप गरम करावे त्यात जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. डाळीच्या पाण्याला वरून फोडणी द्यावी. मीठ घालावे. थोडावेळ उकळी काढावी. गरम गरमच पावाबरोबर खावी किंवा नुसतीच प्यावी.
Labels:
Dal Soup Recipe, Amati recipe, 4 Dals Soup, Lentil Soup, Spicy Lentil Soup
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment